Mahabhulekh – Bhulekh Mahabhumi (Bhumi Abhilekh)

Maha Bhulekh Mahabhumi – Maharashtra 7/12 Utara, 8A, Property Card, Bhu Naksha, Ferfar, Digitally Singed 7/12 and Other land Records.

महाराष्ट्र राज्याने जमिनीचे रेकॉर्डस् आता ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत आता तुम्हाला भूमि अभिलेख कार्यालयात जायची आवशकता नाही. Maha Bhulekh Mahabhumi पोर्टल च्या माध्यमातून तुम्ही 7/12, 8A, Property Card आणि इतर रेकॉर्ड ऑनलाईन प्राप्त करू शकता.

Land Records Available on Mahabhulekh

  • विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक
  • डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक
  • महाभूनकाशा
  • फेरफार माहिती, नोटीस, स्थिती
  • जुने अभिलेख (Old Land Records)
  • Other Services
Note - जर तुम्हाला तुमच्या अधिकार अभिलेखाचा ११ अंकी प्रॉपर्टी यूआयडी क्रमांक माहित असेल तर होय पर्याय निवडून तो टाकून तुम्ही Direct शोधू शकता.

विना स्वाक्षरीतील 7/12 Utara काढण्याची प्रक्रिया

  • विना स्वाक्षरीतील महाभूलेख ७/१२ उतारा काढण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in या पोर्टल वर जा. त्यानंतर अभिलेखाचा प्रकार ७/१२ (7/12) निवडा. नंतर तुम्हाला District, Taluka, आणि Village निवडायचे आहे. खाली आम्ही महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्याची आणि तालुक्यांची सूची दिली आहे.
Amravati (अमरावती)अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम
Aurangabad (औरंगाबाद)औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली
Kokan (कोकण)मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
Nagpur (नागपूर)भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा
Nashik (नाशिक)अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक
Pune (पुणे)कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर
Mahabhulekh 7/12 Utara

  • त्यानंतर ७/१२ शोध घेण्यासाठी सर्वे/गट नंबर किंवा संपूर्ण नाव टाकून शोधा वर क्लिक करा. त्यानंतर सूचि मधून सर्वे नंबर किंवा नाव निवडून मोबाइल नंबर, आणि Captcha दर्ज करून Submit करा.
  • शेवटी 7/12 utara in marathi online येईल यात तुम्हाला अहवाल दिनांक सोबत ULPIN नंबर, मालकांचे नाव, फेरफार माहिती, क्षेत्रफळ आणि इतर माहिती प्राप्त होईल.
Satbara Utara

विना स्वाक्षरीतील 8A काढण्याची प्रक्रिया

  • विना स्वाक्षरीतील ८अ उतारा काढण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in या पोर्टल वर जा. त्यानंतर अभिलेखाचा प्रकार ८अ (8A) निवडा. नंतर तुम्हाला District, Taluka, आणि Village निवडायचे आहे.
  • त्यानंतर ८अ शोध घेण्यासाठी खाते क्रमांक किंवा नाव टाकून शोधा वर क्लिक करा. सूचि मधून खाते क्रमांक किंवा नाव निवडून मोबाइल नंबर, आणि Captcha दर्ज करून Submit करा.
८अ उतारा

  • शेवटी गाव नमुना ८ अ येईल यात तुम्हाला अहवाल दिनांक सोबत खाते क्रमांक, भूमापन आणि उपविभाग क्रं., धारण क्षेत्र, आणि इतर माहिती प्राप्त होईल.
8 A

विना स्वाक्षरीतील Property Card काढण्याची प्रक्रिया

  • विना स्वाक्षरीतील मालमत्ता पत्रक काढण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in या पोर्टल वर जा. त्यानंतर अभिलेखाचा प्रकार मालमत्ता पत्रक (Property Card) निवडा. नंतर तुम्हाला District, Office, आणि Village निवडायचे आहे.
  • त्यानंतर मालमत्ता पत्रक शोध घेण्यासाठी न.भु.क्रं. किंवा नाव टाकून शोधा वर क्लिक करा. सूचि मधून न.भु.क्रं. किंवा नाव निवडून मोबाइल नंबर, आणि Captcha दर्ज करून Submit करा.
मालमत्ता पत्रक

  • शेवटी मालमत्ता पत्रक येईल यात तुम्हाला PU-ID सोबत दिनांक, व्यवहार, खंड क्रमांक, नवीन धारक/पट्टेदार/भार, साक्षांकन आणि आणि इतर माहिती प्राप्त होईल.
Property Card

विना स्वाक्षरीतील K Prat काढण्याची प्रक्रिया

  • विना स्वाक्षरीतील क प्रत काढण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in या पोर्टल वर जा. त्यानंतर अभिलेखाचा प्रकार क प्रत (K Prat) निवडा. नंतर तुम्हाला District, Office, आणि Village निवडायचे आहे.
  • त्यानंतर क प्रत शोध घेण्यासाठी संकलन, मोजणी प्रकार उद्देश, आणि मोजणी प्रकार कालावधी निवडा. मोजणी रजिस्टर क्रमांक, मोबाइल नंबर, आणि Captcha दर्ज करून Search करा.
K Prat

सूचना – विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक आणि क प्रत कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामासाठी वापरता येऊ शकत नाही.

Visit the Official Portal
bhulekh.mahabhumi.gov.in

भूमि अभिलेख संपर्क माहिती

जमाबंदी आयुक्त आणि संचालक
भूमि अभिलेख कार्यालय
तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत,
कौन्सिल हॉल समोर, पुणे
दूरध्वनी : ०२०-२६०५०००६,
ई-मेल : dlrmah[dot]mah[at]nic[dot]in