महाराष्ट्र राज्याच्या भूमि अभिलेख नकाशा विभागाने जमिनीचा भू नकाशा आता ऑनलाइन उपलब्ध केला आहे. जमिनीचा नकाशा हवा असेल तर तो तुम्ही Mahabhunakasha पोर्टल वर ऑनलाइन मिळवू शकता ७/१२ बघण्यासाठी Mahabhulekh पोर्टल वर जा.
महाराष्ट्र भू नकाशा Online काढा
- ई नकाशा महाराष्ट्र जमिनीचा नकाशा काढण्यासाठी mahabhunakasha.mahabhumi.gov.in पोर्टल वर जा.
- त्यानंतर Category, District, Taluka, आणि Village निवडा त्या नंतर त्या ठिकाणचा महाभुलेख नकाशा (Mahabhulekh Nakasha) येईल.

| Amravati (अमरावती) | अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम |
| Aurangabad (औरंगाबाद) | औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली |
| Kokan (कोकण) | मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
| Nagpur (नागपूर) | भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा |
| Nashik (नाशिक) | अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक |
| Pune (पुणे) | कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर |
- नकाशा मधून प्लॉट निवडा त्यानंतर Plot Info येईल इथे तुम्हाला माहिती तपासायची आहे त्यानंतर Map Report वर क्लिक करा.

- Single Plot किंवा Single Plots of Same Owner यातून एक पर्याय निवडा नंतर Show Report PDF वर क्लिक करा शेवटी Bhunaksha Maharashtra 7/12 येईल Download किंवा Print करून तो मिळवा.
